एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना, उपनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना, उपनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-पैसे काढण्यासाठी एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना उपनगर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात शीतफीने ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांनी सांगितले कि,दि 26 ऑगस्ट रोजी पहाटे नाशिक पूणे महामार्गवरील शिवाजी नगर येथील एटीएम मशिन फोडून त्यातुन पैसे काढण्यासाठी दोन युवक गेले. मात्र कोणीतरी येत असल्याची कुणकुण लागल्याने घाबरून ते पळून गेले. हे सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. या

प्रकरणी स्टेट बँकेच्या प्रतिनिधी ने उपनगर पोलिसात फिर्याद दाखल केली. याचा तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, साह्ययक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक सजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हवालदार इम्रान शेख, जयंत शिंदे यांनी परिसरातील सीसी टीव्ही फुटेज तपासून याच परिसरत वाचमन म्हणून काम करणाऱ्या विवेक कुमार व अनिल कुमार (वय 18)यांना ताब्यात घेतले. त्यांनी प्रथमदर्शनी उडवाउडवीचे उत्तरे दिली मात्र त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

अवघ्या तीन दिवसात गुन्ह्यांची उकल केल्याने गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व सहकार्याचे उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी कौतुक केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group