मोठी दुर्घटना : १४व्या मजल्यावरून स्लॅब कोसळला, ४ कामगारांचा मृत्यू ; कुठे घडली घटना
मोठी दुर्घटना : १४व्या मजल्यावरून स्लॅब कोसळला, ४ कामगारांचा मृत्यू ; कुठे घडली घटना
img
Dipali Ghadwaje
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  मुंबईमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ कामगारांचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मालाडच्या दिंडोशीमध्ये ही घटना घडली आहे. एसआरए इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असताना ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , जखमी झालेल्या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मालाड पूर्वेच्या दिंडोशीतील गोविंदनगर येथील एसआरए इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक १४ व्या मजल्यावरून स्लॅब कोसळला. स्लॅबसोबत ७ कामगार खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group