जुन्या भांडणाची कुरापत काढुन एकाची हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना
जुन्या भांडणाची कुरापत काढुन एकाची हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
Dipali Ghadwaje
पेठ  : पेठ तालुक्यातील कोपुर्ली खुर्द येथे जुन्या भांडणाची कुरापत काढत झालेल्या भांडणाचे पर्यावसन सुरीने वार करत खुनात झाल्याची घटना घडली आहे.

खुन करण्यात आलेल्याचे नाव भारत धनराज गवळी (२८) असे असुन आरोपी मधुकर गंगाराम भुसारे व त्याची पत्नी मंगलाबाई मधुकर भुसारे दोघेही रा.कोपुर्ली खुर्द पेठ तालुक्यातील कापुर्णे येथील येथील  रहिवासी आहे. भारत धनराज गवळी हा त्याची सासुरवाडी असलेल्या कोपुर्ली खुर्द येथ राहत होता.

कोपुर्ली खुर्द येथील मारूती मंदीरा जवळ भारत गवळी व मधुकर भुसारे यांच्यात शाब्दिक वादावादी होवुन भारत गवळी यास मधुकरची पत्नी मंगलाबाई हिने पाठीमागून धरून ठेवले तर मधुकर भुसारे याने त्याच्या हातात असलेल्या सुरीने भारत याच्या खांद्यावर व मानेजवळ वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले.

भारत गवळी याचे सासरे पंडीत नामदेव तलवारे रा.कोपुर्ली खु.यांचे फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडक यांनी घटनास्थळी भेट देत पेठ पोलीसांनी आरोपींना चोवीस तासाच्या आत शिताफीने जेरबंद केले.

याबाबत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत पथवे पोलीस उपनिरीक्षक कैलास दरगुडे पोलीस हवालदार रविंद्र तांदळे, मनोज गायकवाड, जाधव, शेख, राऊत आदी अधिक तपास करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group