२२ जुलै २०२४
महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आहे. १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक आणि विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतिक्षा आहे. परंतु विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पाणीच पाणी आहे. अनेक ठिकाणी पूर आला असून धरणांचे दरवाजे उघडले आहे.
आज दिवसभर पावसाचा जोर असणार
कोकणातही मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईतील अनेक भागांत सोमवारी सकाळी जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कल्याण डोंबिवलीतही मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात व रस्त्याच्या कडेला पाणी सचण्यास सुरवात झाली आहे.
ठाण्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील धरणे भरली आहेत.
सरासरी गाठलेले जिल्हे : पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे.
सरासरी ओलांडलेले जिल्हे: सिंधुदुर्ग, सांगली, नगर, बीड, लातूर, परभणी, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ. तेथे सरासरीच्या तुलनेत २० ते ५९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे.
या जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतिक्षा: नंदूरबार, भंडारा, गोंदीया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. या ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी आहे.
Copyright ©2024 Bhramar