पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 3 आपत्तीजनक घटना; एक ठिकाणी महिला वाहून गेली तर दुसऱ्या ठिकाणी...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 3 आपत्तीजनक घटना; एक ठिकाणी महिला वाहून गेली तर दुसऱ्या ठिकाणी...
img
दैनिक भ्रमर
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने काल रात्री पासून तीन आपत्तीजनक घटना घडल्या आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

पहिली घटना इगतपुरी तालुक्यात घडली. इगतपुरी तालुक्यातील मौजे कानडवाडी येथील भीमा काळू पडवळे यांच्या राहत्या घराची भिंत पहाटे पडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही 

दुसरी घटना सुरगाणा तालुक्यात घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री ठीक 8.15 वाजेच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील मौजे. चिचंदा (गहाले) येथील श्रीमती मंगला अमृत बागुल या नदी पार करत असताना नदीला अचानक जोरात आलेल्या पुरामुळे  प्रवाहात वाहून गेल्या. आज सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान मृत्यूदेह नदीकाठी आढळून आला.

तिसरी घटना इगतपुरी तालुक्यातील मौजे काळुस्ते येथे घडली. काल भाम धरणातून सोडलेल्या अतिरिक्त विसर्गामुळे नाल्याचे व नदीचे पाणी मौजे काळुसते ता इगतपुरी  येथील घरांमध्ये शिरले होते. पाच ते सहा कुटुंबे व अंदाजे 20 ते 22 लोकांना तात्पुरत्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group