'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता ; आज कसे असेल हवामान? वाचा IMD चा अंदाज
'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता ; आज कसे असेल हवामान? वाचा IMD चा अंदाज
img
DB
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सोमवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत वेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.

मुंबईत कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मुंबईतील रहिवाशांना हवामान अहवालांवर अपडेट राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. 


महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, कोकणासह पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय. नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आज सोमवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group