राज्यात  पुन्हा मुसळधार पाऊस ! ''या'' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस ! ''या'' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसानं उघडीप दिली आहे, तर काही भागांमध्ये अजूनही पावसाची शक्यता आहे.  पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारपासून दमदार सरींचा वर्षाव होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच 24 तारखेला नागपूरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 23 सप्टेंबरला कोकणातील काही भागात मध्यम व तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.  

सोमवारपासून नाशिकमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात २६ ते ३० ऑक्टोंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. अंदमान बेटाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. मराठवाड्यात अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. नांदेडमध्ये पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून आज आणि उद्या नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी दिला आहे. परभणीत पावसाला सुरुवात झाली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशीव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा गोंदिया वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group