पाथर्डी फाट्यावरील राव टेक्स्टाईलमध्ये आढळले पुमा कंपनीचे बनावट टी-शर्ट व ट्रॅक पॅन्ट, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
पाथर्डी फाट्यावरील राव टेक्स्टाईलमध्ये आढळले पुमा कंपनीचे बनावट टी-शर्ट व ट्रॅक पॅन्ट, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
img
दैनिक भ्रमर

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पुमा ए कंपनीचे स्वामित्व असलेल्या बनावट टी शर्ट, स्वेटर, ट्रॅक पॅन्टची विक्री करणार्‍या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी हरिश्‍चंद्र  नथू राव (वय 56, रा. राजधानी व्हिला, पाथर्डी फाटा, नाशिक) याचे पाथर्डी फाटा येथे राव टेक्सटाईल  नावाचे दुकान आहे. त्याने दुकानात पुमा ए कंपनीचे स्वामित्व असलेले 4 लाख 46 हजार 400 रुपये किंमतीचे पुमा ए कंपनीचा लोगो असलेले 800 नग बनावट टी शर्ट, 72 हजार रुपये किंमतीचे 40 नग स्वेटर,

33 हजार रुपये किंमतीचे बनावट ट्रॅक पॅन्ट, 75 हजार रुपये किंमतीचे पुमा ए कंपनीचा लोगो असलेले स्टीकर, 20 हजार रुपये किंमतीची शिलाई मशिन व 5 हजार रुपये किंमतीचे कापड कटिंग मशिन असा एकूण 5 लाख 83 हजार 900 रुपये किंमतीचा पुमा ए कंपनीचा लोगो वापरुन विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात महेंद्र सोहन सिंग (वय 37, रा. बरेली, राजस्थान) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हरिश्‍चंद्र राव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुंदे करीत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group