जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येईल ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना आता घरूनच करता येईल ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
img
दैनिक भ्रमर
अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणीची प्रक्रिया राबवत आहे . यामुळे  शेतकऱ्यांना घरातूनच अर्ज  करता  येणार आहे आपल्यापैकी बरेच जणांना जमिनीच्या मोजणीसाठी ऑफिसच्या चक्करमारावी लागते. दप्तर, फाईल घेऊन तहसील कार्यालयात जाणे, तासन् तास वाट पाहणे, या सगळ्यागोष्टींमुष्टीं मुळे आपला वेळ आणि पैसा वाया जातो. पण आता या सगळ्याला कायमचे रामराम करण्याची वेळ आली आहे. कारण, आता आपण जमिनीची मोजणी घरबसल्याच ऑनलाइन  करू शकतो.

ऑनलाइन जमीन मोजणी
आपल्याला माहिती आहे की, जमिनीच्या हद्दीबाबत अनेकदा वाद निर्माण होतात. या वादांना तोडगा काढण्यासाठी जमिनीची मोजणी करणे आवश्यक असते. ही मोजणी आता आपण ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. यासाठी आपल्याला तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाईल किंवा संगणकावर बसूनच ही मोजणीसाठी अर्ज करू शकतो.

जमिनीची मोजणीचे प्रकार:
साधी मोजणी        >>  ही मोजणी सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होते.
तातडीची मोजणी   >> ही मोजणी तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होते.
अति तातडीची मोजणी>> ही मोजणी दोन महिन्यांच्या आत पूर्ण होते.

जमिनीची मोजणी का करावी?
जमिनीच्या हद्दीबाबत वाद असल्यासजमीन विकत घेताना किंवा विकताना बँकेकडून कर्ज घेताना जमीन विक्री करार करताना इतर काही कायदेशीर 
 कामांसाठी

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
सरकारी वेबसाइटला भेट द्या >> आपल्या जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
लॉगिन करा .>>  आपला आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
अभिलेख सेवा निवडा >> अभिलेख सेवा या पर्यायावर क्लिक करा.
जमीन मोजणी निवडा >> जमीन मोजणी या पर्यायावर क्लिक करा.
माहिती भरा >>  आपली सर्व माहिती जसे की जिल्हा, तालुका, गाव इत्यादी बरोबर भरा.
फी भरा >>  ऑनलाइन फी भरा.
अर्ज सबमिट करा: सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा

या पद्द्तीचे  फायदे असे कि, आपल्याला तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही.आपण घरबसल्याच अर्ज करू शकता. तसेच , सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने पारदर्शकता राहील.अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.जर तुम्हाला काही अडचण आली तर संबंधित विभागाशी संपर्क साधा. अशा प्रकारे, आपण घरबसल्याच जमिनीची मोजणीसाठी  अर्ज करून आपला वेळ वाचवू  शकतो . 

इतर बातम्या
Join Whatsapp Group