गोदाघाटावर खासगी बसमधून भाविकांच्या ऐवजाची चोरी
गोदाघाटावर खासगी बसमधून भाविकांच्या ऐवजाची चोरी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- खासगी बसमध्ये झोपलेल्या मध्य प्रदेशातील भाविकांच्या जवळील मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रामकुंड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रामप्रसाद शर्मा (वय 68, रा. विजयपूर, जि. शिवपुरी, मध्य प्रदेश) यांच्यासह काही भाविक नाशिक येथे खासगी बसने देवदर्शनासाठी आले होते. दरम्यान, रात्री ही बस गोदाघाटावरील गाडगे महाराज पुलाजवळ प्रवाशांची ही बस थांबली होती.

त्यावेळी सर्व प्रवासी दरवाजा व खिडक्या उघड्या ठेवून झोपले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी फिर्यादी शर्मा यांच्या पँटच्या चोरखिशातून 70 हजारांची रोकड व पती-पत्नीचे आधारकार्ड व मतदान कार्ड व त्यांच्यासोबत असलेले अन्य भाविक सुनीलकुमार शर्मा यांचा आठ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल, बैजनाथ सिंग याचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, तसेच बैजनाथ सिंग यांच्या पँटच्या आतल्या खिशात असलेले साडेसहा हजार रोख, तसेच अन्य प्रवासी रवी बातम यांच्या शर्टाच्या खिशात असलेला सात हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 96 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group