अवैद्य अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला मनमाड पोलिसांनी केली अटक
अवैद्य अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला मनमाड पोलिसांनी केली अटक
img
दैनिक भ्रमर
मनमाड (नैवेद्या बिदरी) :- शहर पोलिसांच्या पथकाने शहरांमध्ये सापळा रचून शिताफीने गावठी बनावटीचे अग्निशस्त्र अर्थात पिस्तूल बाळगणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक जिल्ह्यात मागील काही काळात अवैध अग्निशस्त्र वापरून गुन्हे घडले असल्याने त्यावर प्रतिबंध व्हावा याकरता अवैध अग्नीशस्त्र भागणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले होते. मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांना मनमाड शहरात एक इसम अवैध अग्नीशास्त्र घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी गणेश नरोटे,पंकज देवकाते, संदीप झाल्टे, रणजीत चव्हाण, राजेंद्र खैरनार यांच्या पथकाने सापळा रचून अवैध अग्नीशस्त्र बाळगणारा इसम करण महेंद्र साळवे, वय -२६, राहणार घोडके नगर, ग्रामपंचायत गार्डन जवळ,पिंपळगाव बसवंत,ता.निफाड जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल अर्थात अग्निशास्त्र जप्त करण्यात आले.अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध शहर पोलीस स्थानकात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आले.

सदरची कारवाई ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस पथकाने केली आहे. अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तीबद्दल गोपनीय माहिती असल्यास व्यक्तिशः भेटून माहिती द्यावी. गोपनीय माहिती देणाऱ्या इसमाची ओळख उघड केली जाणार नाही असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group