मोठी बातमी : माजी आमदार संगीता ठोंबरेंवर जीवघेणा हल्ला
मोठी बातमी : माजी आमदार संगीता ठोंबरेंवर जीवघेणा हल्ला
img
दैनिक भ्रमर
बीड : बीडच्या केज मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली गावात ही घटना घडली आहे. संगीता ठोंबरे केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम  आटपून संगीता ठोंबरे परत जात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. संगीता ठोंबरे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका का करण्यात आला? याचा तपास पोलीस करत आहेत

या विषयी अधिक माहिती अशी की ,  दगडफेकीत गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. त्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागला. त्यामुळे त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार चालू आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कोणत्या कारणामुळे संगिता ठोंबरे यांच्यावर दगडफेक करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group