कुत्र्याचा हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ! 'ग्रेट डेन' ने सांभाळ  करणाऱ्याचेच तोडले लचके
कुत्र्याचा हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ! 'ग्रेट डेन' ने सांभाळ करणाऱ्याचेच तोडले लचके
img
दैनिक भ्रमर
कुत्र्याचा हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे.  ही  घट्ना मुंबईतील विक्रोळीमधील असून, गोदरेज कंपनीमध्ये गस्त घालण्यासाठी असलेल्या ग्रेट  डेन जातीच्या कुत्र्याने सांभाळ करणाऱ्या तरुणावरच हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  हसरत अली बरकत अली शेख (22) असं या मृत तरुणाचं नाव आहे.

 या विषयी अधिक माहिती अशी की , विक्रोळी गोदरेज कंपनीमध्ये गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या कुत्र्याने त्याचा सांभाळ करणाऱ्याचा निर्घृणपणे जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. गोदरेजमध्ये मार्शल डॉग एजन्सी या कंपनी मार्फत ही श्वान सिक्युरिटी देण्यात येते. या कुत्र्यांना कंपनीच्या आवारात घेऊन फिरण्याचं काम इथं हसरत अली याच्या सारखे कसाही तरुण करीत असतात. हसरत अलीकडे ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याला घेऊन फिरण्याची जबाबदारी होती. मात्र सोमवारी सकाळी तो नेहमी प्रमाणे या कुत्र्याला घेऊन फिरण्यासाठी गेला असता त्याने हसरत अलीवर जोरदार हल्ला केला. सुमारे अडीच तास हा हल्ला सुरू होता. या कुत्र्याने या तरुणाचे लचके तोडले. रक्तबंबाळ झाल्यामुळे तो जागेवरच बेशुद्ध पडला. पण तरीही या कुत्र्याने त्याला सोडलं नव्हतं.

दरम्यान , घटनेची माहिती मिळताच पोलीस , पालिका श्वानपथक आणि काही प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झालं. कुत्र्याला हसरत अली पासून लांब करण्याचा प्रयत्न करू लागले. पण वारंवार कुत्र्याचा हल्ला सुरूच होता.अखेर 3 तासाने या कुत्र्याला हसरत अलीपासून दूर करण्यात यश मिळालं. हसरत अलीला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र अतिशय गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मार्शल डॉग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group