अनेकदा आपण रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तींचा फोन चोरांनी हिसकावून पळून गेल्याचे बघितले असेल. तसेच दिवसेंदिवस हे प्रमाणही वाढत चालले आहे दरम्यान अशीच एक फोन चोरीला गेल्याची घटना घडली परंतु फोन हिसकावताना चोरटयांनी तरुणीलाही फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे . पंजाब येथून या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणीच्या हातातून फोन हिसकावणाऱ्या दोन चोराचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे
शनिवारी ही घटना उघडकीस आली. जालंतरधरमधील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालंधर येथील रस्त्यावरून जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांन्ही तरुणींचा फोन हिसकावला. तरुणीने फोन वाचवण्याचा अथक प्रयत्न केला. तरुणी फोन वाचवण्याच्या प्रयत्नात होती. अखेर तीला चोरट्यांनी फरफटत नेले. तरीही देखील तरुणी फोन वाचवू शकली नाही. चोरट्यांनी तिला रस्त्याच्या कडेला सुमारे ३५० मीटर पर्यंत खेचून नेले. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली
दरम्यान , या घटनेत तीला दुखापत झाली आणि तिचे कपडेही फाटले. नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला.घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी चोरट्यांवर संताप व्यक्त केला.