गणेशोत्सवाला  गालबोट ! गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
गणेशोत्सवाला गालबोट ! गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
img
दैनिक भ्रमर

गणपतीचे विसर्जन करताना दोन तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची  दुखद घटना घडली आहे . देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरु आहे. तेवढ्यात आंध्र प्रदेशातून एक दुखद घटना समोर आली आहे. गणपतीचे विसर्जन करताना दोन तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला आहे.

ही घटना वीरापानयुनिपल्ले मंडळाची आहे. गणपतीचे विसर्जनासाठी मोगामुरु नदीत दोन तरुण पाण्यात उतरले होते. त्यावेळीस गणपतीचा भार अंगावर पडला आणि दोन तरुण पाण्यात बुडले. दोघांन्हा वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता परंतु त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वामसी आणि राजा असे मृत तरुणांचे नाव आहे. या घटनेनतंर परिसरात एकच खळबळ उडाली आहे


इतर बातम्या
Join Whatsapp Group