किरीट सोमय्या यांचा भाजपला घरचा आहेर , ''या'' निर्णयावर भडकले,  म्हणाले ...
किरीट सोमय्या यांचा भाजपला घरचा आहेर , ''या'' निर्णयावर भडकले, म्हणाले ...
img
दैनिक भ्रमर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  भाजप सज्ज झाल आहे  त्यानुसार आता भाजपाने नेत्यांना जबाबदाऱ्या वाटायला सुरुवात केली दरम्यान भाजपच्या अशाच एका निर्णयाने मात्र  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आपल्या पक्षातील निर्णयामुळे नाराज झाले आहे. किरीट सोमय्यांनी पक्षाला घरचा अहेर देत आपली नाराजी पत्रातून बोलून दाखवली आहे. एवढंच नाही, एवढी अपमानस्पद वागणूक देऊ नका, अशी विनंतीच केली आहे. किरीट सोमय्या यांची ‘विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून त्यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण, भाजपच्या या घोषणेमुळे सोमय्या कमालीचे नाराज झाले असून रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे.

‘आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी,’ असं म्हणत सोमय्यांनी आपली नाराजी पत्रातून बोलून दाखवली आहे.

तसंच, ‘१८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजप-शिवसेनेची ब्ल्यू सी हॉटेल वरळी इथं संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषदेतून जाण्यास सांगितलं होतं. तेव्हापासून मी भाजपचा एक सामान्य सदस्य, कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मधल्या काळात मी ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी स्वीकारली होती. माझ्यावर तीनवेळा जीवघेणे हल्लेही झाले. तरीही मी ही जबाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे,’ असं म्हणत सोमय्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group