कॅशबॅकच्या नावाखाली फसवणूक, ॲपद्वारे लूट !
कॅशबॅकच्या नावाखाली फसवणूक, ॲपद्वारे लूट !
img
दैनिक भ्रमर

आजकाल  सोशल मीडिया चा जमाना असल्याने सर्व काही ऑनलाईन पद्धतीने सर्व काही अगदी सहजतेने उपलब्ध होऊ शकते. त्यात ऑनलाईन  शॉपिंग च तर  फॅड च निर्माण झाला आहे . वेळेअभावी प्रत्यक्षात जाऊन  खरेदी करणे आजकाल सोयीस्कर वाटू लागले आहेत . त्यात भर म्हणजे ऑनलाईन  खरेदी आणि रिचार्ज यावर कॅशबॅक मिळत असल्याने हे लोकांना फायदेशीर हि वाटते परंतु हा कॅशबॅक नावाखाली मोठी फसवणूक हि होऊ शकते . कारण ओन्ल;ऑनलाईन चे फायदे तेवढे तोटेही होतात. दरम्यान असाच एक घोटाळा  समोर आला आहे . 

कॅशबॅकच्या नावाखाली गुरुग्राम येथील एका कंपनीने मोठा घोटाळा केला आहे. टॉकचार्ज नावाच्या कंपनीने लोकांची पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. एका वृउत्तवाहिनीच्या  रिपोर्टमध्ये टॉकचार्ज नावाच्या कंपनीच्या विरोधात केलेल्या तपासणीत धक्कादायक गोष्टी आढळल्या. कॅशबॅकच्या नावाखाली युजर्सना काही महिन्यांत चांगला परतावा मिळेल अशी ऑफर दिली जात होती. हा पाच हजार कोटींचा घोटाळा आहे, असा आरोप फसवणूक झालेल्या लोकांनी केला आहे. या कंपनीने एप्रिल 2024 मध्ये ऑपरेशन बंद केले होते. 

गुंतवणूक कैकपटीने वाढवण्याचे वचन देणाऱ्या ॲपने देशभरात कोट्यवधी लोकांची फसवणूक केली आहे. या ॲपला रेटिंग खूप कमी होतं आणि तरीही हे ॲप जवळपास दोन मिलियन लोकांनी डाउनलोड केले, असा दावा करण्यात आला आहे. देशभरात या ॲपच्या प्रमोटर्सविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत.

सुरुवातीला प्रीपेड पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून टॉकचार्ज लाँच करण्यात आले, त्यानंतर युजर्सना आकर्षक कॅशबॅकच्या ऑफर देण्यात आल्या. त्यामुळे अनेक लोक त्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित झाले. ऑफरमध्ये फक्त 4,999 च्या डिपॉझिटवर 1,666 रुपयांचा कॅशबॅक, तर बँक खात्यात 7,50,000 रुपयांचा मोठा कॅशबॅ मिळवण्यासाठी फक्त 59,999 टॉकचार्ज वॉलेटमध्ये जमा करावे लागतील, अशा ऑफर्सचा समावेश होता. टॉकचार्जवर विश्वास ठेवणं ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असं आता पीडित म्हणत आहेत.

ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेंडरला केलेलं पेमेंट यशस्वी झाले पण बिलरला पैसे मिळाले नाहीत. मार्च 2024 मध्ये ॲप्लिकेशनवरील पैसे विड्रॉल करणे आणि इतर सेवा पूर्णपणे बंद झाल्या. पीडित रामावतार शर्मा म्हणाले, “माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचे एकूण वॉलेट बॅलेन्स 1.19 कोटी रुपये आहे. हे पैसे मला परत न मिळाल्यास अनेक अडचणींचा सामना मला करावा लागेल.“ कॅशबॅकच्या नावाखाली या ॲपद्वारे अनेकांची फसवणूक करण्यात आली. सीएनएन-न्यूज 18 च्या तपासणीत या ॲपमध्ये देशभरातील 800 लोकांनी पैसे गमावले आहेत.

दरम्यान , संपूर्ण देशभरात टॉकचार्जच्या प्रमोटर्सविरुद्ध अनेक तक्रारी आणि एफआयआर दाखल झाले आहेत. एका  वृत्तसंस्थेला  गुरुग्राम पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केलेल्या एफआयआरबद्दल माहिती मिळवण्यात यश आले आहे. या एफआयआरनुसार फक्त अंकुश कटियारच नाही तर को फाउंडर शिवानी माहेश्वरी आणि टॉकचार्जच्या काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group