विधानसभेत बाजी कोणाची ? काय आहे ओपिनियन पोल? वाचा सविस्तर
विधानसभेत बाजी कोणाची ? काय आहे ओपिनियन पोल? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर

सध्या  महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभेचे वारे वाहत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा राजकारणात जोरदार रणधुमाळी पाहायला मिळतेय. सर्वच पक्ष आपल्या परीने जोरदार तयारीला लागले आहेत तसेच समोरच्या पक्षाला कशी मात देता येईल या अनुषन्गाने आपली रणनीती आखत आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीचा ओपिनियन पोल समोर आला आहे.

ओपिनियन पोलनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआत कांटे की टक्कर पाहायलामिळणार आहे. महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला 129 ते 144 जागामिळण्याचा अंदाज आहे. या ओपिनियन पोलनुसार, भाजपच राज्यातला एक नंबरचा पक्ष असणार आहे. पण भाजपच्या जागा घटणार आहेत. 

ओपिनियन पोलनुसार, राज्यात भाजपला सर्वाधिक 83 ते 93 जागा मिळतील. तर शिवसेना शिंदे गटाला 42 ते52 जागा मिळतील. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 7 ते 12 जागांवर समाधान मानावं लागण्याचीशक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक 58 ते 68 जागा मिळण्याची शक्यता आहे.त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 35 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला 26 ते31 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांना 3 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

तसेच , विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेचा किती टक्के फायदा झाला? याबाबतची सर्व्हेकरण्यात आला. यामध्ये 58 टक्के लोकांचं मत आहे की, ही योजना प्रभावी ठरली आहे. तर 24 टक्के लोकांचंम्हणणं आहे की, ही योजना काही प्रमाणात प्रभावी ठरली आबे. 6 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत काहीच फायदा होणार नाही. 5 टक्के नागरिकांनी सांगू शकत नाही, असं उत्तर दिलं आहे. तर 7 टक्के नागरिकांनी लाडकी बहीण योजना ही प्रचाराची एक पद्धत होती, असं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी आवडता चेहरा कोण? याबाबतली सर्व्हे करण्यात आला आहे. पोलनुसार,राज्यातील 37 टक्के जनतेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच चेहऱ्याला जास्त पसंती आहे. त्यानंतर माजी त्यानंतर माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यांना प्रत्येकी 21 टक्के पसंती आहे. शरद पवारांना 10टक्के आणि इतरांना 11 टक्के पसंती मिळाली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group