या वर्षी ईद-ए-मिलाद-उन-नबी 16 सप्टेंबर रोजी साजरी केली जात आहे यानिमित्ताने या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असेल.या प्रसंगी, भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, बँका आणि शाळा पूर्णपणे बंद राहतील म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी भारतात सार्वजनिक सुट्टी असेल. 15 सप्टेंबरला रविवार असल्याने शाळा बंद राहतील, तर 16 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त शाळा बंद राहतील. दरम्यान, शाळेतील मुलांना सलग दोन दिवस सुटी मिळणार आहे.
रबी-उल-अव्वल महिन्यात प्रेषित मोहम्मद यांची जयंती ईद मिलाद उन नबी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की प्रेषित मोहम्मद यांचा जन्म इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेतील तिसरा महिना रबी-उल-अवलच्या 12 तारखेला झाला होता, म्हणून त्यांची जयंती या दिवशी साजरी केली जाते.
ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त महाराष्ट्रातील शाळा, बँका, सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. सोमवारी ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त सर्वांना सार्वजनिक सुट्टी असेल. मंगळवारी अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येणार असून या दिवशी 10 दिवसाच्या बाप्पाचे गणपती विसर्जन करण्यात येणार आहे.