कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू - (महसूल विभाग)
ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान - (नियोजन विभाग)
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता - (नगर विकास विभाग)
ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता - (नगर विकास विभाग)
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार - (नगर विकास विभाग)
देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना. - (पशुसंवर्धन विभाग)
भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार - (क्रीडा विभाग)
रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा - (महसूल विभाग)
राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार - (जलसंपदा विभाग)
जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार - (जलसंपदा विभाग)
लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता - (जलसंपदा विभाग)
धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन - (महसूल विभाग)
रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत - (नगर विकास विभाग)
केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार - (गृहनिर्माण विभाग)
पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक - (बंदरे विभाग)
धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना. धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी - (गृहनिर्माण विभाग)
सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख - (वित्त विभाग)
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार - (कृषी विभाग)
सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ - (इतर मागास बहुजन कल्याण)
जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार - (इतर मागास बहुजन कल्याण)
राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ - (गृह विभाग)
नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार - (वैद्यकीय शिक्षण)
आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती - (वैद्यकीय शिक्षण)
राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण - (कौशल्य विकास)
आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ - (नियोजन विभाग)
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५ - (विधी व न्याय विभाग)
अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित - (सामान्य प्रशासन विभाग)
बार्टीच्या धरतीवर वनार्टी स्वायत्त संस्था - (इतर मागास बहुजन कल्याण)
मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत - (महसूल विभाग)
जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय - (ग्रामविकास विभाग)
पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार - (उद्योग विभाग)
राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे - (शालेय शिक्षण)
शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही - (वित्त विभाग)
अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर - ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला - ( सामान्य प्रशासन विभाग)
राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण. - (शालेय शिक्षण)
डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ - (कृषी विभाग)
महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा - (महसूल विभाग)