2 फटाका कारखान्यांमध्ये स्फोट; ९ कामगारांचा होरपळून मृत्यू
2 फटाका कारखान्यांमध्ये स्फोट; ९ कामगारांचा होरपळून मृत्यू
img
दैनिक भ्रमर

तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात दाेन फटाका करखान्यांमध्‍ये आज दुपारी स्फोट झाला. या दुर्घटनेत ९ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

तमिळनाडूतील शिवकाशीमधील फटाका युनिटमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला, तर कम्मापट्टी गावात फटाका युनिटला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच, अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहचली. अग्निशम दलाकडून बचावकार्य करण्यात येऊन आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. दरम्यान, कारखान्यात काम करणाऱ्या ९ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 


यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी तमिळनाडूतील विरागलूरमध्ये अशाचप्रकारे फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट होऊन आग लागली. या स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group