बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क मुलींनी केली दुचाकीची चोरी
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क मुलींनी केली दुचाकीची चोरी
img
दैनिक भ्रमर
फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना या महिन्यात तरुणाईला वॅलेंटाईन वीक चा निम्मिताने संधी असते आपलं प्रेम व्यक्त करण्याची. आणि काही तरुण तरुणी सर्वोतपरी प्रयत्न करतात की जेणेकरून आपले प्रियकर प्रियसी खुश व्हावे. अशीच एक घटना समोर आली आहे. तरुणींनी आपल्या बॉयफ्रेंला भेटण्यासाठी चक्क दुचाकीची चोरी केली आहे. गोंदियातून ही घटना  समोर आली आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या गोपालदास मुरझानी यांच्या घरासमोरून दोन मुलींनी दुचाकी चोरली. सकाळी 10.30 वाजता चक्क दोन मुलींनी आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी दुचाकी चोरली. दुचाकी चोरण्याऱ्या दोन्ही मुलींनी अगोदर परिसरात पायी फिरत रेकी केली .रेकी केल्यानंतर चक्क काही वेळातच गाडी चालू करून गाडी चोरली

दुचाकी चोरीला गेल्याची याची तक्रार गोपालदास मुरझानी यांनी गोंदिया शहर पोलिसात केली. शहर पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेतले असून गाडीही जप्त केली आहे. तर पुढील तपास गोंदिया शहर पोलीस स्टेशन करत आहे. विशेष म्हणजे दोन्ही मुली या विधी संघर्ष बालिका आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group