उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ? काय म्हणाले संजय राऊत ?
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ? काय म्हणाले संजय राऊत ?
img
दैनिक भ्रमर
दिल्लीत आपचा मोठा पराभव झाला आहे. आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढल्याने हा पराभव झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी देखील इंडिया आघाडीच्या या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच,  उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत रहायचे नाही यावर आता पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल असे ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान , उद्धव  ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांना जनतेने 10 वर्ष निवडून दिल आहे. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आलेला एका पक्षाने सत्ता घेतली. मतदार याद्यातून हजारो नाव गायब केली आहेत.दिल्लीतील रिकामे बंगले आहेत त्यात कोणी राहत नाही त्यांचे नाव नोंदवले आहे. केजरीवाल हरले. या पराभवाचं मुख्य कारण काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढले आहे. आमच्या इंडिया ब्लॉक मधील दोन पक्ष एकत्र आले असते तर निकाल वेगळा लागला आसता.फरक फार मोठा नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group