राज्य शासनाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येणार असून राज्यातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत तब्बल 3 कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात अ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला 1 कोटीचे बक्षीस हे मिळणार आहे.
याच्या अंतर्गत सर्वांना आपली बस स्थानके आहेत ती सर्व सुधारायचे असून यामध्ये तीन टप्पे असणार आहेत. राज्यस्तरीय, प्रादेशिक आणि विभागीय यातील टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येकासाठी वेगवेगळे बक्षीस असे असणार आहे. राज्यातून जे बस स्थानक सर्वात सुंदर असेल त्याला शासनाकडून 1 कोटी देण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर जे द्वितीय येणार आहे त्याला 50 लाख आणि तृतीय येणाऱ्या 25 लाख अशी बक्षीसाची रक्कम देण्यात येणार आहे.
ज्यामध्ये बस स्थानकामध्ये सर्व सोयी सुविधांना आवश्यक आहेत. त्या ठिकाणची रस्ते देखील चांगले आवश्यक आहेत. शौचालय देखील चांगले असायला हवीत. त्याचबरोबर प्रवाशांना बसण्यासाठी जे आसन आहेत ते देखील चांगले असले हवेत. असे सर्व यासाठी नियम हे असणार आहेत. 500 पेक्षा जास्त फेऱ्या असणारे जे बस स्थानक आहेत ते अ गटामध्ये येतात. ज्या बस स्थानकामध्ये अडीचशे फेऱ्या होतात अशी बस स्थानक ते ब गटात येतात आणि क गटामध्ये अडीचशे पेक्षा कमी फेऱ्या असणारे बस स्थानक येतात.
छत्रपती संभाजीनगर विभागाने देखील यासाठी चांगली तयारी करायला सुरुवात केलेली आहे. आम्ही सर्व बस स्थानकांना सूचना दिलेल्या आहेत. तिथल्या सर्व आगार प्रमुखांना सांगितले आहे की तुम्ही आपली बस स्थानके स्वच्छ करावीत, चांगली सुशोभित करावीत जेणेकरून आपल्याला देखील बक्षीस मिळतील, असे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी सांगितले आहे.