धक्कादायक  ! पुणे न्यायालय परिसरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
धक्कादायक ! पुणे न्यायालय परिसरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
img
दैनिक भ्रमर
पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक कारणातून तरुणाने शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातच चिंचेच्या झाडाला गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी भरदुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सोहेल येणीघुरे (२८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोहेल वेटबिगारी म्हणून काम करतो. पाषाण येथे वास्तव्यास असलेल्या सोहेलचे पत्नीशी वाद झाले. तुझ्याशी घटस्फोट घ्यायचाय, असे म्हणून तो पत्नी आणि दोन लहानग्या मुलांना घेवून शिवाजीनगर न्यायालयात आला. शनिवार असल्याने आज न्यायालयाला सुट्टी होती. त्यामुळे आवारात कोणी नव्हते. तेथे आल्यानंतर पती – पत्नीत पुन्हा वाद झाला. त्यातून सोहेलने पत्नीची ओढणी घेत चिंचेच्या झाडावर चढून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group