बारावीच्या परीक्षेची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते. दरम्यान आता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निकालही लवकर जाहीर करणार आहोत, 15 मे पर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल असं शरद गोसावी यांनी म्हटलं आहे. उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होणार असल्यानं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
दरम्यान, सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून दिले जाणार आहेत, या आधी पेपरच्या आधी 10 मिनिटं वाढवून दिले जात होते, परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर देखील पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.
तसेच , संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएससह लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही केलं जाणार असल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे.दरम्यान , पुढे बोलताना ते म्हणाले की, या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.त.
.