नाशिक :- येथील अनंत कान्हेरे मैदानावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एका १९ वर्षीय युवतीवर प्रेम प्रकरणातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे
याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की १९ वर्षीय पिडीत युवतीचे तिच्याच नातेसंबंधातील मुला सोबत गेल्या काही वर्षापासून प्रेम संबंध होते. दोघांचे विवाह करण्याचेही त्यांचे ठरले होते मात्र त्यादरम्यानच पीडित तरुणी अन्य मित्रासोबत गोल्फ क्लब मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता त्याला भेटण्यासाठी आली. तिने त्या मित्रासोबतचा फोटो तिच्या इंस्टाग्राम वर टाकला. याचा प्रियकराला राग आल्याने तो तिथे पोहोचला. आपले लग्न करायचे ठरले आहे तरी ही तू दुसऱ्यासोबत का फिरत आहे असा जाब विचारला. मात्र त्या मुलीने त्याला उडवा-उडवीचे उत्तरे दिले. रागाच्या भरात त्याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने मुलीवर हल्ला केला.
संबंधित मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित गणेश विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत.