धक्कादायक  !  सिगारेट  पिण्याच्या वादातून दोन मित्रांवर ब्लेडने वार
धक्कादायक ! सिगारेट पिण्याच्या वादातून दोन मित्रांवर ब्लेडने वार
img
दैनिक भ्रमर
राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून अनेक गंभीर स्वरूपाचे गुणे देखील सर्रास पणे केले जातात. तर काही गुन्हे राग वाद विकोपाला गेल्यावरून घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना पुणे येथे घडली आहे. सिगरेट पिण्याच्या वादातून तरुणाने दोन मित्रांवर ब्लेडने वार केले आहेत. 


सिगारेट  पिण्याच्या वादातून एका तरुणाने दोन जणांवर ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कुडाळवाडी भागातल्या चिखलीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. दुसरीकडे सिगरेट ओढ, हे सांगितल्यामुळे या वादाला सुरूवात झाली आणि तरुणाने दोघांवर ब्लेडने वार केले. शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्यादिवशी आरोपीला अटक केली आहे.

जफर अहमद शोहराबाली शाह असं या आरोपीचं नाव असून तो 28 वर्षांचा आहे. जफर हा कुडाळवाडी भागातीलच रहिवासी आहे. शनिवारी गणेश शिंदे या 24 वर्षांच्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली. जफरने केलेल्या हल्ल्यात पुष्कर नेवाळे आणि उदय तळे हे दोन जण जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे आणि त्याचे मित्र शुक्रवारी रात्री अंडा भुरजीच्या गाडीवर गेले होते. तिकडे खात असताना बाजूलाच जफर सिगरेट ओढत होता, तेव्हा शिंदेने त्याला बाजूला जाऊन सिगरेट ओढायला सांगितलं, यातून वादाला सुरूवात झाली. यानंतर जफरने त्याच्याकडची ब्लेड बाहेर काढली आणि पुष्कर, उदय यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस उपनिरीक्षक राजेश मसाळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group