नंदुरबारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या ९ वर्षांपासून येमेन येथून आलेलं एक कपल नंदुरबारमध्ये राहत होतं. अखेर हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.सदर जोडपं हे येमेन रहिवाशी हे गेल्या नऊ वर्षापासून बेकायेदीशीर पद्धतीने अक्कलकुव्यात वास्तव्यास असून त्यांच्या कुटंबीयातील काही सदस्यांचे भारतीय पुरावाच्या कागदपत्रे देखील तयार करण्यात आल्याची धक्कादायक समोर येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्थेत अवैधपणे राहणाऱ्या 2 येमेन येथील पती-पत्नीसह संस्थाचालकांवर नंदुरबार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेख खालेद इब्राहीम सालेह अल खदमी आणि त्यांची पत्नी खादेजा इब्राहीम कासीम अल नाशिरी हे दोघे मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा घेवून 2015 मध्ये भारतात आले होते. यानंतर डिसेंबर 2015 मध्ये पुरुषाचा तर कुटंबीयांचा व्हिसा फेब्रुवारी 2016 मध्ये संपला. या दरम्यान व्हिसा संपला असताना देखील सदर इसम एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेला होता. ही बाब मध्यप्रदेश पोलिसांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत त्या ठिकाणी गुन्हा नोंदवला.
याबाबत संबंधीत येमेन नागरीकांने जबलपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जामिनीसाठी केलेल्या अर्जानुसार येमेन दुतावासमध्ये राहण्याच्या अटीवर संबंधीताला जामीन देण्यात आला होता. न्यायालायच्या या अटीशर्तीचा भंग करुन हे कुटुंब अक्कलकुव्यातील जामीयाच्या कॉर्टर्समध्ये वास्तव्यास आहे. तर दरम्यान मध्यप्रदेशमधल्या याच खटल्यात भैसदेही येथील न्यायालयाने ३ वर्षाचा सश्रम कारावास आणि 1 हजार द्रव्यदंडाची संबंधीताला शिक्षा ठोठावली. ज्यावर संबंधीताने सत्र न्यायालयात अपिल केले असून प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.
तर याच नऊ वर्षाच्या कालवधीत या येमेनच्या जोडप्याला आणखीन दोन मुली झाल्या असून अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या जन्म दाखल्यावर कायमचा पत्ता हा जामीयाचा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर या दोन्ही मुलीचे पासपोर्ट देखील तयार करण्यात आले असून त्यात त्यांचे नागरीकत्व भारतीय असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
संबंधीत कुटुंबीय हे येमेनचे असतांना देखील जामीया संस्थेनं त्यांची मदत करुन त्यांना वास्तव्यास ठेवत त्यांना महत्वाची दस्ताऐवज बनवण्या कामी मदत केली म्हणून पोलिसांनी या दोन्ही येमेनच्या पती पत्नीसह जामीयाचे संस्थापक गुलाम रंधेरा वस्तनवी त्याचे मुलगा हुजेफा मोहम्मद रंधेरा वस्तनवी यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक दर्शन दुग्गड याबाबतचा अधिकचा तपास करत आहे.