धंनजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होत असून धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांनी वांद्र्याच्या कौटुंबिक कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असून त्यांना महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय मुलीला लग्नापर्यंत 75 हजार रुपये देण्यात यावेत, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. दरम्यान , यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मी अगोदरच सांगितलं होतं, करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, असं मी मला वाटतं एका बाईटमध्ये म्हटलं होतं, आणि आता त्या पलिकडे आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांची पहिली असो, दुसरी असो यावर आता आम्हाला काही चर्चा करायची नाही. आमचा फोकस हा संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि देशमुख यांना न्याय मिळावा यावर आहे. ती आमची फस्ट प्रायोरेटी आहे. आणि महादेव मुंडे ते बिचारं 38 वर्षाचं लेकरू त्याचे लेकरबाळ रडत आहेत. महादेव मुंडे यांचे देखील मारेकरी सापडले पाहिजेत, ही आमची प्रायोरेटी आहे. धनंजय मुंडेंची पहिली बायको, दुसरी बायको आणखी काय काय, ते आम्हाला बोलू नका अन् विचारू नका, असं धस यांनी म्हटलं आहे.