आधी तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची चर्चा, पण आता आला नवीन ट्विस्ट
आधी तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची चर्चा, पण आता आला नवीन ट्विस्ट
img
दैनिक भ्रमर
माजी मंत्री आणि शिवसेना विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी अपहरणाची तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून तानाजी सावंत यांच्या मुलाची शोधाशोध सुरू झाली, पण पोलीस तपासात या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून तानाजी सावंत यांचा मुलगा दुपारी सव्वाचार वाजता घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो चार्टर फ्लाईटने बँकॉकला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या सगळ्या प्रकरणात तानाजी सावंत यांनी त्यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली गेली होती. पण प्राथमिक माहितीनुसार ऋषीराज सावंत याचे घरी काही वाद झाले होते, यानंतर तो बँकॉकला गेल्याचं समजतंय. यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे, तसंच तानाजी सावंत सतत पोलिसांच्या संपर्कात आहेत.

दरम्यान , ऋषीराज सावंत बँकॉकला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्यामुळे पोलिसांकडून विमान कंपनीशी संपर्क साधला जात आहे. बँकॉकला जाणारं हे चार्टर प्लेन भारताच्या हद्दीत असेल तर भारतातल्या विमानतळावरच उतरवलं जाणार आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group