बसची वाट पाहणाऱ्या तरुणीचे रिक्षावाल्याने केले अपहरण, लैंगिक अत्याचार  अन.. नेमकं काय घडलं?
बसची वाट पाहणाऱ्या तरुणीचे रिक्षावाल्याने केले अपहरण, लैंगिक अत्याचार अन.. नेमकं काय घडलं?
img
दैनिक भ्रमर
देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून दरदिवशी महिला अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. महिलांचे अपहरण, बलात्कार  अशा घटना सातत्याने घडत असल्याने महिला सुरक्षित नसल्याचे निदर्शनास येतेय. आता पुन्हा अशीच एक महिला अपहरण आणि अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या चेन्नईमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या प्रकाराने फक्त समाजालाच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही खळबळ माजवली आहे. सोमवारी रात्री 18 वर्षीय तरुणी किलंबक्कम बस टर्मिनसजवळ बसची वाट पाहत उभी होती. मात्र, बस येईपर्यंतचा वेळ तिच्यासाठी भयंकर ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ऑटो रिक्षाचालकाने त्या मुलीला ऑटोमध्ये बसण्याची विनंती केली, मात्र तिने नकार दिला. यानंतर जो प्रकार घडला, तो कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारा आहे. त्या ऑटो चालकाने तिला जबरदस्तीने ओढून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पण एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. त्यानंतर अजून 2 गुंड आले आणि चाकूचा धाक दाखवत तिच्यावर पाशवी कृत्य केले.

पीडित तरुणी मदतीसाठी ओरडत होती, पण ऑटो वेगाने पळवली जात होती. त्या वेळी काही प्रवाशांनी आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता गुन्हेगारांनी मुलीला रस्त्यावर सोडले आणि तेथून पळ काढला. सुदैवाने, एक पोलीस अधिकारी त्या वेळी जवळच होते, ज्यामुळे तिचा जीव वाचला.

पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि CCTV फुटेजच्या आधारे 5 जणांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर, पोलिसांनी ऑटोचालक मुथामिल सेल्वन आणि त्याचा साथीदार दयालनला अटक केली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group