गडकिल्ल्यांवर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला !
गडकिल्ल्यांवर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला !
img
दैनिक भ्रमर
आजकाल गडकिल्ल्यांवर फिरायला जाण्याचा कल मोठ्याप्रमाणावर वाढला असून अनेक पर्यटक खूप आवडीने आणि उत्साहाने गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग साठी जात असतात. ट्रेकिंग साठी गेलेल्या पर्यटकांनवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.साताऱ्यामध्ये ही  घटना घडली असून  पांडव गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

इंदापूर तालुक्यातील नरसिंहपुर येथील सहजन वाई तालुक्यातील पांडव गड येथे गिर्यारोहणासाठी गेले होते. तेथे त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला करून जखमी केलं. परफ्युमच्या वासामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना तेथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं गेलं होतं. या पैकी दोघांना आज सातारा येतील रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. तर एक पुणे येथे जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले आहे.

ट्रेकिंगला गेलेले सहाजण पांडव गड येथे गेले होते. तेथे त्यांच्यावर मधमाश्यानी हल्ला केल्यावर हे गिर्यारोहक सैरावैरा पळाले कोणाचा कोणाला थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे काही वेळ गोंधळ पसरला होता. त्यातील एकाने रेस्कू करणाऱ्यांना फोन केला स्थानिकांच्या मदतीने त्यांना खाली आणून प्राथमिक उपचार केले आणि हॉस्पिटलला दाखल केले. आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, हजारो मधमाश्यांच्या घेर्‍यात सापडलेल्या गिर्यारोहकांपैकी अल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ अवटी, गोपाळकर दंडवटे हे 4 जण गंभीर जखमी झाले होते. तर अन्य दोन तरुण बेशुद्ध पडले होते. त्यांना रेस्कू टीमच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं अन् रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, अत्तराच्या आणि परफ्यूमच्या वासाने पांडवगडावर असलेल्या मधमाशांचे पोळे विचलित झाले आणि यातूनच मधमाशांनी थेट गिर्यारोहकांवर हल्ला चढवला. त्यामुळे ट्रेकिंगला जात असाल तर अत्तर किंवा परफ्यूम मारून जाऊ नये. तसेच जिथं मधमाश्यांचं पोळं असेल तिथं कोणताही कृती करू नये. ट्रेकिंगला जात असताना अंगभर कपडे घालून जाणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे माश्या, मच्छर आणि जंगली किड्यांपासून संरक्षण होऊ शकतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group