पर्यटकांना गड किल्यांवर पर्यटनासाठी जाणे आवडते. गड किल्ल्यांवर जाणे तेथील ऐतिहासिक माहिती घेणे तसेच नवनवीन माहिती घेणे पर्यटकांचा आवडता छंद असतो. अशाच एक पर्यटकाचा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा करून मृत्यू झाला आहे. तोरणा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या पर्यटकाचा मृतदेह रेस्क्यू टीमने अवघड टप्प्यातून खाली उतरवत आणला आहे. सह्यादीच्या गड-किल्ल्यांवर पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
पुण्यातील दोन पर्यटक शनिवारी संध्याकाळी तोरणा किल्ल्यावर गेले होते, मात्र त्यातल्या रणजित शिंदे यांना अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. यानंतर रणजित शिंदे यांना त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी मंदिरात नेलं, मात्र तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर रणजित शिंदे यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने पोलीस आणि रेस्क्यू टीमला संपर्क केला. यानंतर एस.एल. ऍडव्हेंचर टीमचे सदस्य आणि स्थानिक बचाव पथकाने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रेस्क्यू एक्सपर्ट लहू दादा आणि त्यांचे सहकारी खानापूरहून रोप, स्ट्रेचर, हेड टॉर्च इत्यादी आवश्यक बचाव साहित्य घेऊन पाबे घाट मार्गे तोरणा किल्ल्याच्या घटनास्थळी रवाना झाले.
ऍडव्हेंचर टीमने अत्यंत साहसाने तोरणा किल्ल्याच्या अवघड अशा वाटेने रणजित शिंदे यांचा मृतदेह किल्ल्याच्या पायथ्याशी आणला. यानंतर रणजित शिंदे यांचा मृतदेह त्यांच्या घरी रवाना करण्यात आला.