राज ठाकरेंच्या भेटीवर  मुख्यमंत्र्यांनी सोडले मौन ,नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर
राज ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्र्यांनी सोडले मौन ,नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीचे सरकर स्थापन झाले असून राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी समोर येत आहे.याच दरम्यान आता , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते . आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. यानंतर भाजप नेत्यांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.मुंबई, पुणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्यासोबत कोणती चर्चा झाली असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी चर्चा तुम्हीच सुरू करता असे म्हटले. आज राज ठाकरेंसोबत झालेली भेट ही राजकीय भेट नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी फोन करून अभिनंदन केले. त्यावेळी आपण भेटणार असल्याचे सांगितले. आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ एक कार्यक्रम होता. त्याआधी राज यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज यांच्यासोबत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही. त्यांच्या ब्रेक फास्ट केला, गप्पा मारल्या. या गप्पांना राजकीय संदर्भ नव्हते. निव्वळ मैत्रीतून ही भेट झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group