अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या ''इतक्या'' भारतीयांना हात-पाय बांधून पाठवलं, महाराष्ट्रातल्या तिघांचा समावेश, नेमकं प्रकरण काय ?
अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या ''इतक्या'' भारतीयांना हात-पाय बांधून पाठवलं, महाराष्ट्रातल्या तिघांचा समावेश, नेमकं प्रकरण काय ?
img
दैनिक भ्रमर

अमेरिकेत जाऊन राहावे तसेच तिथेच सेटल व्हावे असे अनेकांचे स्वप्न असते. असेच स्वप्न घेऊ अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांना मात्र अमेरिकेने तेहत घरचा रास्ता दाखवला आहे. अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 104 भारतीय नागरिकांना अमेरिकेने पुन्हा एकदा भारतात पाठवलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , अमेरिकन लष्कराच्या विमानाने या नागरिकांना बुधवारी भारतात पाठवण्यात आलं आहे. या सगळ्यांचे हात-पाय बांधून अमेरिकेने भारतात पाठवलं आहे. अमेरिकेने भारतात पाठवलेल्या या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातल्या तिघांचा समावेश आहे. या सर्व नागरिकांना गोपनीय पद्धतीने चोख सुरक्षा व्यवस्थेत अमृतसरहून त्यांच्या घरी पाठवलं गेलं आहे. प्रशासकीय आणि पोलिसांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नागपूरचे हरप्रीत सिंग लालिया (वय 33 वर्ष), मुंबईचे गुरूविंदर सिंग (वय 44) आणि अडगावचे प्रशांत अनिल जहागिरदार (वय 32 वर्ष) या महाराष्ट्रातल्या नागरिकांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आलं आहे. हे तिघंही लाखो रुपये खर्च करून डंकी रूटने अमेरिकेमध्ये गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघंही काहीच महिन्यांपूर्वी अवैधरित्या अमेरिकेमध्ये गेले होते. या तिघांकडून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पासपोर्टही जप्त केले आहेत.

104 अवैध भारतीय प्रवाशांना घेऊन अमेरिकन लष्कराचं विमान सी-17 ग्लोबमास्टर बुधवार दुपारी 1 वाजता अमृतसरच्या गुरू रवीदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलं. या विमानात 11 क्रू मेंबर्सशिवाय 45 अमेरिकन अधिकारीही होते. विमानतळाबाहेर मीडियाचा गराडा होता, पण अवैध प्रवाशांना गुपचूप मागच्या दरवाजाने बाहेर काढून अज्ञात स्थळी नेण्यात आलं. त्याआधी अमृतसरच्या विमानतळावर सगळ्या 104 भारतीयांची चौकशीही केली गेली. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या तिघांना पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. नागपूरमध्ये राहणाऱ्या तरुणाला पहिले मुंबईला आणि मग तिकडून नागपूरला पाठवण्यात येणार आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group