छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वादग्रस्त विधान अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. सोलापूरकर याच्या या विधानावरून राज्यभरात पडसाद उमटले होते.
दरम्यान, राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी राहुल सोलापूरकर यांच्या माफीची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशाराही खरात यांनी दिला आहे.
रामजी सकपाळ नावाच्या या एका बहुजना घरात जन्माला आलेले भीमराव जो आंबावडेकर नावाच्या गुरुजीकडून दत्तक घेतला जातो. त्याच नावावरून पुढे भिमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हटलं आहे, तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या आर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर याने केलं आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळे फासू, असा इशारा रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी दिला आहे. राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात हे विधान अत्यंत निषेधार्थ वक्तव्य केलं असल्याचे खरात यांनी म्हटले. राज्य सरकारने तात्काळ सोलापूरकर यांच्यावर कारवाई सरकारने करावी, आणि राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.