कारागृहात कैद्याचा खून
कारागृहात कैद्याचा खून
img
Dipali Ghadwaje
पुणे  : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हत्येच्या या घटनेमुळे येरवडा कारागृह पुन्हा एकदा हादरले आहे.

महेश महादेव चंदनशिवे असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. पूर्व वैमन्यासातून 4 कैद्यांकडून महेशची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्री आणि धारदार हत्याराने मानेवर वार करत महेशची हत्या करण्यात आली. 

अनिकेत समदूर, महेश तुकाराम माने, गणेश हनुमंत मोटे आणि आदित्य संभाजी मुरे अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दरोडा घालणे, चोरी अशा आरोपांखाली महेश हा येरवडा कारागृहात होता. दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पण पूर्ववैमानस्य मनात ठेवून या चौघांनी कारागृहात महेशची हत्या करण्यात आल्याचे समजते. 

महेश चंदनशिवे याच्यावर पिंपरी, चिखली आणि भोसरी या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. सन 2013 ते 2022 या कालावधीत एकूण 12 गुन्ह्यांअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दरोडा घालणे, चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. दरोड्याची तयारी करून अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात महेश चंदनशिवे हा 30 नोव्हेंबर 2022 पासून येरवडा कारागृहात होता. 

हत्या केलेल्यांपैकी गणेश मोटे हा एका गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या आहे. याच टोळीचा महेश माने हा सदस्य असल्याची माहिती देण्यात आली.  मोटे आणि माने हे दोघेही सांगवी येथील योगेश जगताप खून प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. त्याचप्रमाणे  फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. मोकांतर्गत ते कारागृहात आहेत. तर अनिकेत समदूर हा पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2022 मध्ये झालेल्या एका खून प्रकरणात तो वर्षभरापासून कारागृहात होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group