'आमच्या पिढीतले कलाकार जास्त मेहनती, आताचे फक्त....!' नव्या कलाकारांविषयी काय बोलली करिना
'आमच्या पिढीतले कलाकार जास्त मेहनती, आताचे फक्त....!' नव्या कलाकारांविषयी काय बोलली करिना
img
Dipali Ghadwaje
बॉलीवूडमध्ये बेबो म्हणून लोकप्रिय असणाऱ्या करिनाची गोष्टच वेगळी आहे. तिनं अभिनयानं एक वेगळे स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले आहे. करिनानं आता ओटीटीवर डेब्यू केलं असून त्याची चर्चा होत आहे. याशिवाय तिनं नवी पिढी आणि जुनी पिढीतील कलाकार यांच्याविषयी केलेलं वक्तव्य लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

यावेळी करिनानं सध्याच्या पिढीतील नव्या दमाच्या कलाकारांविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. करिना म्हणते, मी आता जे काही बोलणार आहे त्याविषयी माफी मागते. पण मला एक सांगायचे आहे की, अजुनही आमच्या काळातील अभिनेते नव्या कलाकारांपेक्षा चांगले काम करत आहेत.

करिनाला जेव्हा तिच्या वयावरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिला काहीसा राग आला. दरवेळी मला वयावरुन प्रश्न का विचारता. वय हा केवळ आकडा आहे. तुमचा स्क्रिनवर परफॉर्मन्स कसा आहे हे जास्त महत्वाचे आहे. लोकांचे तुम्ही कशाप्रकारे मनोरंजन करता हे पाहिले जाते. तुम्ही आमच्या अगोदरच्या पिढीला त्यांच्या वयावरुन कधी प्रश्न विचारत नाही. मग आम्हालाच का...असा सवालही करिनानं यावेळी उपस्थित केला.

करिनच्या प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास, ती प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या क्राईम थ्रिलर द बकिंगहॅम मर्डर्समध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती एक निर्माती म्हणून देखील सहभागी झाली आहे. तसेच तिच्याकडे द क्रु नावाचा चित्रपट असून त्यात ती तब्बू आणि क्रिती सेनन यांच्यासोबत स्क्रिन शेयर करणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group