१७ जानेवारी २०२४
जमिनीच्या वादावरून १० जणांच्या टोळक्याने एका इसमाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना चांदवड तालुक्यात घडली. राजू केदू शिंदे ( वय ४५ रा. दुगाव शिवार ता. चांदवड ) असे खुन झालेल्या इसमाचे नाव आहे.
याबबत अधिक माहिती अशी की, जमिनीच्या वादावरून चंचल भानुदास क्षीरसागर व विनोद क्षीरसागर यांनी आपल्या इतर सहकार्यांसह राजू शिंदे यांना शिवीगाळ करून संशयित पियुष सुतारने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने राजूच्या छातीत भोसकले आणि डाव्या हाताच्या दंडावर गंभीर दुखापत केली . तसेच राज क्षीरसागरने त्याच्या हातातील चाकूने राजू यांच्या डोक्यावर वर केल्याने या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी चांदवड पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून , पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नऱ्हे करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar