मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ
नाशिक (प्रतिनिधी) :- मुलगी झाली, तसेच माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. 7 ऑगस्ट 2013 ते दि. 31 ऑगस्ट 2016 या कालावधीत आडगाव शिवारात श्रीरामनगर येथे गजसिद्धी रो-हाऊस या ठिकाणी सासरी नांदत होती.
त्यावेळी पती सोनू महेश पंडित, सासरे महेश शिव पंडित, सासू सावित्रीदेवी पंडित, दीर राजू पंडित व रवी पंडित यांनी संगनमत करून विवाहितेला मुलगी झाली म्हणून व माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून कुरापत काढून विवाहितेला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करून मानसिक व शारीरिक छळ केला.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देवरे करीत आहेत.