पार्ट टाईम जॉबच्या लोभापायी गमावले नऊ लाख रुपये
पार्ट टाईम जॉबच्या लोभापायी गमावले नऊ लाख रुपये
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- पार्ट टाईम जॉबच्या लोभापायी एका इसमाने नऊ लाख रुपये गमावल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दिनेश ईश्वर नगराळे (वय 48, रा. श्री स्वामी समर्थनगर, आडगाव शिवार, पंचवटी) यांचे गिफ्ट हाऊस नावाचे दुकान आहे. नगराळे हे पार्ट टाईम जॉबच्या शोधात होते. त्यादरम्यान 7672896558 या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावरील प्रोफाईल नाव आलिशा (एचआर डिस्नेस्टार) हिने नगराळे यांच्याशी संपर्क साधला. त्यात त्यांना फायनान्स बिझनेस ग्रुप या टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. 

ग्रुपने दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी दिलेल्या टास्कमधील विविध गुगल मॅपवरील रिव्ह्यू व कमेंट सबमिट केल्यानंतर, विथड्रॉल रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर कमिशनद्वारे नगराळे यांच्या खात्यावर रक्कम जमा करीत आली. वेळोवेळी असे टास्क पूर्ण केल्यानंतर भरलेले पैसे परत मिळविण्याकरिता, तसेच व्हीआयपी मेंबरकरिता अशा विविध कारणांचा बहाणा करून संशयित मोबाईल क्रमांकधारक महिलेने नगराळे यांच्या बचत खात्यातील रक्कम, क्रेडिट लोन व फायनान्स कंपनीकडून लोन प्राप्त करून दिलेल्या विविध यूपीआय आयडीवर, तसेच आयएमपीएसद्वारे नगराळे यांना वेळोवेळी नऊ लाख दहा हजार रुपये भाग पाडण्यास भाग पाडले. हा प्रकार दि. 12 जानेवारी ते 8 एप्रिल 2023 यादरम्यान टेलिग्राम व व्हॉट्सॲपवरून घडला.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करूनही त्याचा मोबदला मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नगराळे यांनी संशयित व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group