राहुल गांधी यांना संत शंकरदेव मंदिरात जाण्यापासून रोखलं,आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेत काय घडलं?
राहुल गांधी यांना संत शंकरदेव मंदिरात जाण्यापासून रोखलं,आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेत काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये पोहोचलीय. भारत जोडो न्याय यात्रा आज आसामच्या नागांव जिल्ह्यात आहे. नागांव जिल्ह्यात आसामचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थळ आहे. राहुल गांधी यांना आज वैष्णव संत शंकरदेव यांच्या जनमस्थळाचं दर्शन घ्यायचं होतं. मात्र, राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं. यानंतर ते मंदिराबाहेर कार्यकर्त्यांसह बसले. यावेळी त्यांनी मंदिरात दर्शन घेण्याची परवानगी अगोदर देण्यात आली होती आता आत जाण्यापासून रोखलं जातंय, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात न जाता सोमवारी दुपारी तीननंतर तेथे यावे, असे व्यवस्थापन समितीने म्हटले आहे. राहुल गांधी पोलिसांनी रोखल्यानंतर संतापले. राहुल गांधी यांनी विचारले की आज फक्त एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते का? आम्हाला तिथे बोलावण्यात आले होते आणि आता तुम्ही जाऊ शकत नाही असे सांगितले जात आहे, मी का जाऊ शकत नाही याचे कारण विचारतोय? असे यावेळी राहुल गांधी  म्हणाले.

राहुल गांधी मंदिर प्रवेशावर ठाम
'मी का जाऊ शकत नाही? मी काय चूक केली आहे? मला फक्त जाऊन हात जोडायचे आहेत, आदर द्यायचा आहे. मी जाऊ शकत नाही, असे प्रशासन सांगत आहे, मग मी का जाऊ शकत नाही? अशी विचारणा राहुल यांनी केली. 

बारदोवाचे महत्व काय?
बारदोवा थान हे 15व्या-16व्या शतकातील सामाजिक-धार्मिक सुधारक आणि आसामी संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान परिसरात वसलेले आहे. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जोगेंद्र नाथ देव महंत यांनी रविवारी दुपारी बारदोवाचे काँग्रेस आमदार शिबामोनी बोरा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अनेक संस्थांनी भक्तिमय कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

काय म्हणाली बार्दोवा थान समिती?
बार्दोवा थान समितीने सांगितले की, 'त्या ठिकाणी हजारो लोक येण्याची अपेक्षा आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही गांधींना दुपारी 3 वाजण्यापूर्वी आवारात प्रवेश करू देऊ शकत नाही. महंत म्हणाले, ' राहुल गांधी यांच्या भेटीबाबत बोरा यांचे पत्र आम्हाला मिळाले असून आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो, मात्र आम्ही त्यांना दुपारी 3 वाजेपूर्वी आवारात प्रवेश करू देऊ शकत नाही.'

काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
यापूर्वी आज आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 22 जानेवारी रोजी बारदोवा येथील श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानाला भेट देणे टाळावे. ते म्हणाले की, प्रभू राम आणि मध्ययुगीन वैष्णव संत यांच्यात स्पर्धा होऊ शकत नाही. हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की, राहुल गांधींनी अनावश्यक स्पर्धा निर्माण करू नये, हे आसामसाठी दुःखदायक असेल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group