क्रिकेट खेळण्यास नकार दिल्याने महिलेवर जिवघेणा हल्ला
क्रिकेट खेळण्यास नकार दिल्याने महिलेवर जिवघेणा हल्ला
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) : गल्लीमध्ये क्रिकेट खेळू देत नाही, या कारणावरून कुरापत काढून एका जणाने महिलेचा विनयभंग करीत दोन जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी पुरुषाने काल (दि. 24) रात्री संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून गल्लीमध्ये क्रिकेट खेळू देत नाही, यावरून कुरापत काढून फिर्यादी महिला व दोन साक्षीदारांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला, तसेच साक्षीदारांना धारदार हत्याराने मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूनआरोपीला अटक करण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group