जेलरोडला सकाळी चोरट्यांनी महिलेची पोत ओरबाडली
जेलरोडला सकाळी चोरट्यांनी महिलेची पोत ओरबाडली
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी) :- आज सकाळी मॉर्निंग वॉक करताना जेलरोड येथे एका महिलेचे दीड तोळा वजनाची सोन्याची पोत कारमधून आलेल्या भामट्यांनी बळजबरीने खेचून नेली.

याबाबत माहिती अशी, की चरणदास मार्केटमागे राहणार्‍या जया वसंत काटे (वय 54) या आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नाशिककडून दसककडे जाणार्‍या रस्त्याने मॉर्निंग वॉक करीत होत्या. त्यावेळी कारमधून आलेल्या काही अनोळखी इसमांपैकी एकाने त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला व आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाची सुमारे पाऊण लाख रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने ओरबाडून नेली.

त्यानंतर कारमध्ये बसून हे भामटे नाशिकरोडच्या दिशेने पसार झाले.भर सकाळी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्यतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.अधिक तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group