पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहे. मुंबई, नाशिक, पुणे, सोलापुर नंतर आता पुन्हा पुणे दौऱ्यावर नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी येणार आहेत.
१९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असून विविध विकासकामांचं भूमिपुजन, लोकार्पण देखील होणार आहे. तर पुण्याच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्कार हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले निमंत्रक असून त्यांनी तशा पद्धतीची घोषणा देखील केली आहे.