आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट ;  भाजप पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट ; भाजप पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
img
दैनिक भ्रमर
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप पदाधिकारी विकी गणात्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती  मिळालीये. गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिसांसमोर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांच्या तपासाला आता वेग आला आहे.
 
या प्रकरणामध्ये आज विकी गणात्रा याला ताब्यात घेण्यात आलं आहे, अटकेची कारवाई सुरु आहे. या प्रकरणमध्ये विविध पथक तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून तपास सुरु आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी गणपत गायकवाड यांना तातडीने अटक केली होती. त्यांच्यासह तेथे उपस्थित अन्य कार्यकर्त्यांना देखील त्याचवेळी अटक करण्यात आली. त्यानंतर आता आणखी एका भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये गणपत गायकवाड यांच्यासह संदीप सरवनकर, हर्षल केने यांना अटक करण्यात आली होती. तसेच गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, विकी गणात्रा, नागेश बडेकर हे तीन जण फरार होते.

अशात आता व्यावसायिक व भाजप पदाधिकारी विकी गणात्रा याला देखील ठाणे खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय, अशी माहिची मिळाली आहे. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि साथीदार नागेश बडेकर हे दोघे अद्याप फरार असून ठाणे क्राइम ब्रांच विविध पथक या दोघांचा शोध घेत आहेत.

crime | BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group