एसटी-बस ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 'इतके' प्रवासी.....
एसटी-बस ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 'इतके' प्रवासी.....
img
Dipali Ghadwaje
बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.  

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय.  अपघातग्रस्त बस  पुण्यावरून शेगावला जात होती. या बसमधून २० ते २२ प्रवासी प्रवास करीत होते.

शुक्रवारी पहाटे बस चिखली-देऊळगावराजा मार्गावरील रामनगर फाट्याजवळ आली असता, चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात मालवाहू ट्रक आला.काही क्षणातच मालवाहू ट्रकने बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या घटनेत बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेला प्रवासी खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

इतर बातम्या
Join Whatsapp Group