लेकाचं भाषण ऐकताना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी ;  म्हणाले.....
लेकाचं भाषण ऐकताना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी ; म्हणाले.....
img
Dipali Ghadwaje
कोल्हापूर : शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर शिवसेनेचं अधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं हे पहिलंच अधिवेशन आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दमदार भाषण केलं. लेकाचं दमदार भाषण ऐकताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. 

याबाबत एकनाथ शिंदे यांनी भावनिक ट्विट केलं आहे. श्रीकांतचं भाषण ऐकताना सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला, असं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे 

काय आहे एकनाथ शिंदे यांचं ट्विट? 
सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.



दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं. शिवाय मनातील भावनाही एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवल्या आहेत. शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेंच्या भाषणाचं कौतुक केलंय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group