"बाहेर वेगळे पण आतून सगळे एकच" राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
img
Dipali Ghadwaje
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त आज राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये जनसंबोधन केलं. या भाषणात राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार गट आतून एकच असल्याचा दावा केला आहे. शरद पवार आणि अजित पवार गट बाहेर वेगळे, पण आतून सगळे एकच आहेत, असा मोठा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.  

राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी म्हटलं की, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते. सांगताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असं सांगितलं म्हणून कोणत्या गटाचे विचारले तर, तीन शरद पवार, दोन अजित पवार गटाचे होते, पण भेटायला मात्र एकत्र आले होते. माझे ठाम मत आहे, हे सर्व आतून एक आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.

यावेळी राज ठाकरे त्यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. निवडून येणाऱ्या माणसाची मोळी आहे. शरद पवार हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group